My Ideal Team
बचतगट घोटाळ्यांपासून दूर ठेवण्यास मदत

  • बऱ्याच ठिकाणी शासनाने देऊ केलेले अनुदान व इतर फायदे मिळवण्यासाठी एक-दोघेजण बचतगट स्थापन करतात व इतर सभासद फक्त नावापुरते असतात, प्रत्यक्षात त्यांना कोणत्याच प्रकारचा फायदा मिळत नाही.
  • परंतु BachatGat App च्या वापराने प्रत्येक बचतगटामध्ये सुशासन व पारदर्शकता आणली जाते. सर्व सभासदांना आपल्या बचतगटाचे सर्व आर्थिक व्यवहार मोबाइलमध्ये अतिशय सोप्या भाषेत दिसतात व त्याद्वारे सर्व सभासद बचतगटाचा समान फायदा घेऊ शकतात.

बचतगटांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती

  • BachatGat App मध्ये शासनाच्या बचतगटांसाठी असणाऱ्या सर्व शासकीय योजनांची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. त्या शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया अतिशय सोप्या भाषेत उपलब्ध आहे.
  • BachatGat App द्वारे आपल्या बचतगटाचे पारदर्शक आर्थिक व्यवहार दाखवून सभासद शासनाकडून, बँकेकडून, नाबार्डकडून व NGO कडून अनुदान व अत्यंत कमी व्याजदरात कर्ज मिळवू शकतात.

बचतगटाची एकूण रक्कम व त्यातील तुमचा एकूण वाटा पाहण्याची सोय

  • बचतगट वहीचा वापर करून बचतगटाची एकूण रक्कम काढणे व त्यातुन सभासदांचा प्रत्येकी वाटा काढणे ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.
  • परंतु BachatGat App द्वारे प्रत्यक्षात कोणताही हिशोब न करता आपल्या बचतगटाची एकूण रक्कम व त्यातील सभासदांचा प्रत्येकी वाटा पाहण्याची सोय उपलब्ध आहे.

सर्व सभासद BachatGat App वापरू शकतात

  • BachatGat App अध्यक्ष, सचिव व इतर सर्व सभासद वापरू शकतात. माहिती टाकण्याचा अधिकार फक्त अध्यक्ष व सचिव यांना राहील. बाकीचे सभासद ती माहिती पारदर्शकपणे आपल्या मोबाईलमध्ये पाहू शकतात.

सभासद संख्येवर कोणतेही बंधन नाही

  • बचतगट वहीमध्ये आपण जास्तीत जास्त फक्त २० सभासदांचे व्यवहार लिहू शकतो परंतु BachatGat App द्वारे तुम्ही वाटेल तेवढे सभासद ऍड करून त्यांचे व्यवहार हाताळू शकतात.

अनेक प्रकारच्या व्याजदराने कर्ज देऊ शकता

  • बचतगट वही द्वारे एका महिन्यात कोणत्याही एकाच व्याजदराने कर्ज वाटले जाते परंतु BachatGat App द्वारे एका महिन्यात अनेक प्रकारच्या व्याजदराने कर्ज वाटले जाऊ शकते.

व्हाट्सअ‍ॅप मेसेज पाठवण्याची सोय

  • BachatGat App मध्ये व्हाट्सअ‍ॅप मेसेज पाठवण्याची सोय उपलब्ध आहे, त्याद्वारे तुम्ही सर्व सभासदांना सूचना, प्रलंबित बचत, प्रलंबित कर्जहप्ता व इतर सर्व माहिती पाठवू शकता.
  • कोणत्याही बचत महिन्याचा पूर्ण हिशोब व्हाट्सअ‍ॅप द्वारे बचतगटाच्या सभासदांना पाठवण्याची सोय BachatGat App मध्ये उपलब्ध आहे.

PDF स्वरूपात सर्व रिपोर्ट डाउनलोड करण्याची सोय

  • तुम्ही PDF स्वरूपात मासिक अहवाल डाउनलोड करून जतन करू शकता. तुम्ही त्याची प्रिंट सुद्धा काडून ठेवू शकता.
  • बचतगटाचे व सभासदांचे बॅलन्सशीट (ताळेबंद) PDF स्वरूपात डाउनलोड करण्याची सोय उपलब्ध आहे. शासनाकडून व बँकेकडून कर्ज घेण्यासाठी बॅलन्सशीट (ताळेबंद) ची गरज असते.

मासिक बचत जमा व येणे बाकी असलेल्या सभासदांची माहिती पाहण्याची सोय

  • मासिक बचत जमा केलेल्या सभासदांची यादी व मासिक बचत जमा करणे बाकी असलेल्या सभासदांची यादी पाहण्याची सोय BachatGat App मध्ये उपलब्ध आहे.
  • जर बचत जमा करण्यास उशीर झाला असेल तर दंड रक्कम पाहण्याची सोय सुध्दा BachatGat App मध्ये उपलब्ध आहे.
  • कृपया खालील नमुना उदाहरणे तपासा,

मासिक बचत जमा केलेले सभासद
# सभासद बचत दंड
1 श्री.निलेश बाळासाहेब साळुंके ₹1000 ₹0
2 श्री.वीरप्रताप निलेश साळुंके ₹1000 ₹0
- - ₹1000 ₹0
मासिक बचत येणे बाकी असलेले सभासद
# सभासद बचत दंड
1 श्री.शौर्यप्रताप निलेश साळुंके ₹1000 ₹100
कर्जहप्ता जमा व येणे बाकी असलेल्या सभासदांची माहिती पाहण्याची सोय

  • चालू बचत महिन्यात कर्जहप्ता जमा केलेल्या व कर्जहप्ता येणे बाकी असलेल्या सर्व सभासदांची सविस्तर यादी पाहण्याची सोय BachatGat App मध्ये उपलब्ध आहे.
  • सविस्तर माहितीमध्ये सभासदाचे नाव, कर्ज रक्कम, मासिक व्याजदर, मासिक व्याज व दंड रक्कम पाहण्याची सोय उपलब्ध आहे.
  • कृपया खालील नमुना उदाहरणे तपासा,

कर्जहप्ता जमा केलेले सभासद
# सभासद कर्जहप्ता व्याज दंड
1 श्री.निलेश बाळासाहेब साळुंके ₹1000 ₹40 ₹0
₹500 ₹40 ₹0
2 श्री.वीरप्रताप निलेश साळुंके ₹1500 ₹40 ₹0
₹1000 ₹30 ₹0
- - ₹4000 ₹150 ₹0
कर्जहप्ता येणे बाकी असलेले सभासद
# सभासद कर्ज % व्याज दंड
1 श्री.शौर्यप्रताप निलेश साळुंके ₹4000 1% ₹40 ₹50
₹1000 2% ₹20 ₹50
- - ₹5000 - ₹60 ₹100
चालू बचत महिन्यातील व सध्याची सर्व कर्जवाटप माहिती पाहण्याची सोय

  • चालू बचत महिन्यात घेतलेल्या सर्वं कर्ज वाटपाची सविस्तर माहिती पाहण्याची सोय BachatGat App मध्ये उपलब्ध आहे. सोबत सध्याची सर्वं कर्जवाटप पाहण्याची सोय सुद्धा BachatGat App मध्ये उपलब्ध आहे.
  • सविस्तर माहिती मध्ये सभासदाचे नाव, कर्ज रक्कम, मासिक व्याजदर व मासिक व्याज रक्कम पाहण्याची सोय उपलब्ध आहे.
  • कृपया खालील नमुना उदाहरणे तपासा,

चालू महिन्यातील सर्व कर्जवाटप माहिती
# सभासद कर्ज % व्याज(मा)
1 श्री.निलेश बाळासाहेब साळुंके ₹8000 1% ₹80
2 श्री.वीरप्रताप निलेश साळुंके ₹10000 1% ₹100
₹4000 2% ₹80
- - ₹22000 - ₹260
बचतगटाची सध्याची सर्व कर्जवाटप
# सभासद कर्ज % व्याज(मा)
1 श्री.निलेश बाळासाहेब साळुंके ₹11000 1% ₹110
₹1500 2% ₹30
2 श्री.वीरप्रताप निलेश साळुंके ₹12500 1% ₹125
₹4500 2% ₹90
3 श्री.शौर्यप्रताप निलेश साळुंके ₹4000 1% ₹40
₹1000 2% ₹20
- - ₹34500 - ₹415
तुम्ही घेतलेले कर्ज व कर्जफेड माहिती पाहण्याची सोय

  • तुम्ही घेतलेल्या कर्जाची सध्याची शिल्लक राहिलेली रक्कम व भूतकाळात फेडलेल्या कर्जहप्त्यांची सविस्तर माहिती पाहण्याची सोय BachatGat App मध्ये उपलब्ध आहे.
  • सविस्तर माहिती मध्ये कर्ज रक्कम, मासिक व्याजदर, मासिक व्याज, कर्जहप्ता, भरणा तारीख व दंड पाहण्याची सोय उपलब्ध आहे.
  • कृपया खालील नमुना उदाहरणे तपासा,

तुम्ही घेतलेले कर्जे माहिती
कर्ज व्याजदर व्याज दंड भरणा तारीख
₹11000 1% ₹110 ₹0 01/03/2021
₹1500 2% ₹30 ₹0 01/03/2021
₹12500 - ₹140 ₹0 -
माघील भरलेले कर्जहप्ते माहिती
बचत महिना कर्ज कर्जहप्ता व्याजदर व्याज दंड
फेब्रुवारी 2021 ₹4000 ₹1000 1% ₹40 ₹0
फेब्रुवारी 2021 ₹2000 ₹500 2% ₹40 ₹0
सध्याचे कर्ज जोखीम प्रमाण माहिती पाहण्याची सोय

  • सध्या कोणत्या सभासदाने त्याच्या बचतगटातील एकूण वाट्याच्या किती प्रमाणात कर्ज घेतले आहे हे पाहण्याची सोय BachatGat App मध्ये उपलब्ध आहे.
  • या द्वारे एखाद्या सभासदाला आणखी कर्ज देणे जोखमीचे राहील की नाही हे सहज कळून आपला बचतगट विना जोखीम ठेवण्यात मदत होईल.
  • कृपया खालील नमुना उदाहरणे तपासा,

सध्याचे कर्ज जोखीम प्रमाण
प्रत्येकी बचगटातील वाटा: ₹11,533.33
# सभासद कर्ज % जोखीम
1 श्री.निलेश बाळासाहेब साळुंके ₹12500 108% थोडी
2 श्री.वीरप्रताप निलेश साळुंके ₹17000 147% जास्त
3 श्री.शौर्यप्रताप निलेश साळुंके ₹5000 43% नाही
- - ₹34500 - -
चालू बचत महिन्यातील इतर खर्च व उत्पन्न माहिती पाहण्याची सोय

  • चालू बचत महिन्यात बचत, कर्जहप्ता, व्याज व दंड सोडून जे इतर उत्पन्न झाले आहे ते सविस्तर पाहण्याची सोय BachatGat App मध्ये उपलब्ध आहे.
  • सोबत चालू बचत महिन्यात कर्ज वाटप सोडून जो इतर खर्च झाला आहे तो पाहण्याची सोय सुध्दा BachatGat App मध्ये उपलब्ध आहे.
  • कृपया खालील नमुना उदाहरणे तपासा,

या बचत महिन्यातील इतर खर्च
# इतर खर्च वर्णन खर्च रक्कम
1 मासिक मिटिंग खर्च ₹550.00
या बचत महिन्यातील इतर उत्पन्न
# इतर उत्पन्न वर्णन उत्पन्न रक्कम
1 शासकीय अनुदान ₹15,000.00
कोणत्याही बचत महिन्यातील सर्व हिशोब पाहणे व डाऊनलोड करणे

  • कोणत्याही बचत महिन्यात झालेला सर्व व्यवहार व सविस्तर हिशोब पाहण्याची सोय BachatGat App मध्ये उपलब्ध आहे.
  • तो सविस्तर हिशोब तुम्ही PDF फाईल मध्ये डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे जतन करून ठेवू शकता.

कोणत्याही कालावधीचे बॅलन्सशीट (ताळेबंद) पाहणे व डाऊनलोड करणे

  • कोणत्याही कालावधीचे बचतगटाचे बॅलन्सशीट (ताळेबंद) पाहणे व डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध आहे. सोबत कोणत्याही सभासदाचे बॅलन्सशीट (ताळेबंद) पाहणे व डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध आहे.
  • ते सविस्तर बॅलन्सशीट (ताळेबंद) तुम्ही PDF फाईल मध्ये डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे जतन करून ठेवू शकता. शासनाकडून व बँकेकडून कर्ज घेण्यासाठी बॅलन्सशीट (ताळेबंद) ची गरज असते.